डोंबिवली ( प्रतिनिधी ) : कोपर गावातील स्वयभू नागेश्वर मंदिर भाविकांनी शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करून प्रार्थना केली. डोंबिवली पश्चिमेकडील कोपरगाव मधील स्वयभू नागेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती. स्थायी समितीचे माजी सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे आणि परिवहन समितीचे माजी सभापती संजय पावशे यांनी शिवशंकराचे दर्शन घेतले. या मंदिरात शिवभक्तांनी महादेवाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती.गावातील या मंदिराची ख्याती पंच्कोश्रीत प्रसिद्ध असून शिवशंकराचे दर्शन घेण्यासाठी दूर गावातून भाविक येत असतात.
कोपर गावातील स्वयभू नागेश्वर मंदिर महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी
February 21, 2020
82 Views
1 Min Read

-
Share This!