ठाणे

तीर्थक्षेत्र पिंपळेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री मोठ्या उत्सवात साजरी

डोंबिवली ( शंकर जाधव ) : महाशिवरात्री डोंबिवलीतील जवळील सागाव येथील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले पिंपळेश्वर महादेव मंदिरात महापौर विनिता राणे यांनी शिवशंकराचे दर्शन घेतले. मंदिर व्यवस्थापनाने भक्तांना दर्शन घेता यावे यासाठी चोख व्यवस्था केली होती. मंदिराच्या प्रांगणात विविध संस्थानचे स्वयंसेवक भक्तांची सेवा आणि मार्गदर्शन करत होते.मंदिराच्य प्रागणात अखंड श्रीराम,जय राम, जयराम राम मंत्र जप,नेत्र परीक्षण,चष्मा वाटप शिबीर, आरोग्य निदान तपासणी शिबीर ह.भ.प.श्री जयेश महाराज भाग्यवंत मु.आंबेगाव यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळाचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे, उपाध्यक्ष रतन चांगो म्हात्रे,सचिव पंढरीनाथ पाटील,सहसचिव अरुण पाटील,खजिनदार गजानन म्हात्रे,सहखजिनदार रघुनाथ पाटील यासह अनेकांनी अथक मेहनत घेतली.यावेळी शिवसेना नगरसेविका प्रेमा म्हात्रे, दिपाली पाटील यांसह अनेकांनी शिवशंकराचे दर्शन घेतले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

महाराष्ट्र

पंचायत राज यंत्रणेमार्फत शाश्वत विकासाची उद्दीष्टे गाठण्याचे प्रयत्न; ग्रामविकासाच्या योजनांच्या अंमलबजावणीत शाश्वत उद्दीष्टांचा समावेश आवश्यक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Advertisements

Advertisements

कोकण

error: Content is protected !!