ठाणे

दिव्यात महाशिवरात्रीचा उत्साह शिगेला

ठाणे : दिव्यात इच्छतेश्वर शिवशक्ती मंदिरात गेली 32 वर्षांपासून सुरु असलेला महाशिवरात्रीचा उत्सव लाखो भाविकांनी फुललेला दिसून आला. सन 1988 मध्ये इच्छतेश्वर शिवशक्ती मंदिराची स्थापना श्री ब्रम्हlशेठ पाटील यांनी केली असून मंदिर बनवण्यासाठी त्यांना दिवा रेल्वेच्या पटरीमधून व होडीतुन मंदीर साहित्य आनावे लागले होते आज दिव्यासारख्या शहरात लाखोच्या घरात शहरीकरण झाल्याने महाशिवरात्रीमुळे आज लाखोच्या घरात भक्तगणानी दर्शन घेतले. आजच्या महाशिवरात्री निमित्त मंदिरात भजन, प्रवचन, बालोउपासना, पालखी सोहळा, भंडारा व महाप्रसादाचाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पासून भक्तगण दर्शनासाठी रांगा लावतात म्हणून त्यांना चहा व अल्पउपहारची सोय मंदीर समितीचे अध्यक्ष श्री चरण पाटील यांनी केली होती. सदर महाशिवरात्री निमित्त दिवा ग्रामस्थlसह शेकडो स्थानिक रहिवाशी दिवसरात्र नियोजन करताना आढळून आले. प्रसंगी स्थानिक नगरसेवक अमर ब्रम्हlशेठ पाटील यांनी सर्व भाविकांना अल्पउपहार व दुसऱ्या दिवशी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेण्यास आवाहन केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!