डोंबिवली ( शंकर जाधव ) : श्री सागांवेश्वर शिव मंदिर (सागाव) येथील मंदिरात महाशिवरात्र उत्सवालासात वर्ष पूर्ण होत आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांसह अनेक राजकीय नेतेमंडळीनी शिवशंकराचे दर्शन घेतले.संस्था प्रमुख कर्ण मदन जाधव,अध्यक्ष देविद्त्त तिवारी, खजिनदार मीना सिंह, अँड.राजेश जाधव, शाम जाधव, दिलीप जाधव,यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.एम.जे.ग्रुप, सागाव ग्रामस्थ मंडळ,फक्त राजे प्रतिष्ठान, सागांवेश्वर महिला शक्ती बचत गट मंडळ,मानस प्रचार हौसाबाई चॅरीटेबल सेवा संस्थान,गांगेश्वर भजन मंडळ, ऊॅ शिव साई सेवा संस्था,श्री देव वेताळ खळनाथ भजन मंडळ, एम.जे.बॉयस, श्री विश्वकर्मा प्रगती मंडळ या सेवेकरी मंडळाचे सहकार्य मिळाले.या मंदिर परिसरात मानस प्रचार हौसाबाई चॅरीटेबल सेवा संस्थानच्या वतीने श्री राम कथा प्रवचन आणि ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री सांगावेश्वर शिव मंदिरात महाशिवरात्र उत्साहात साजरी
February 21, 2020
27 Views
1 Min Read

-
Share This!