गुन्हे वृत्त

उलवा इथं भरदिवसा एका महिलेची निर्घृण हत्या.

नवी मुंबई,2 (संतोष पडवळ)  : नवी मुंबईतील उलवा इथं भरदिवसा एका महिलेचे अपहरण करून तिची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना घडली आहे. उलवा येथील सेक्टर 24 मध्ये ही घटना घडली आहे. प्रभावती भगत असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, प्रभावती भगत या आपल्या मुलासोबत लग्नाला कारने निघाल्या होत्या. वहाळ गावाजवळील अभ्युदया बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी मुलाने कार थांबवली. मात्र, त्याने कार चालूच ठेवली होती. तो एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. यावेळी कारमध्ये प्रभावती भगत या एकट्याच बसल्या होत्या.प्रभावती यांना एकटं बघून चोरट्यांनी कारमध्ये शिरून कारसह त्यांना पळवून नेलं. काही अंतरावरील निर्मनुष्य ठिकाण बघून चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने आणि पैसे घेतले आणि महिलेवर गोळीबार करून नंतर गाडी उलव्यामधील सेक्टर 24 मध्ये सोडून पसार झाले. महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याने चोरीच्या हेतूने ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!