डोंबिवली ( शंकर जाधव ) : रिक्षाचालकांकडून नागरिकांची होत असलेली लुट आता थांबणार असून डोंबिवली सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहित भोईर यांच्या मागणीला परिवहन व्यवस्थापकाने हिरवा सिग्नल दिला आहे. सोमवारी डोंबिवली पश्चिमेकडील `ह`प्रभाग क्षेत्राजवळून परिवहन उपक्रमाची एक मिनी बस सुरु झाली. सकाळपासून दुपारपर्यत मिनी बसेसच्या ६ फेऱ्यांमध्ये प्रती प्रवासी पाच रुपये प्रमाणे १८० रुपये उत्पन्न मिळाले. या बसेसच्या दिवसभरातून १० फेर्या होणार असून प्रतिदिन ५०० रुपयांपेक्षा जास्त परिवहन सेवेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी या बसमध्ये तिकीट काढून स्टेशनपर्यत प्रवास केला.
यावेळी स्थायी समितीचे सभापती विकास म्हात्रे, डोंबिवली सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहित भोईर,कॉंग्रेस नगरसेवक नंदू म्हात्रे, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडल महिला अध्यक्षा सुवासिनी राणे,मनसे महिला पदाधिकारी नीलिमा भोईर, वाहतुक पोलीस निरीक्षक एस.एन.जाधव. यांसह ज्येष्ठ नागरीक आणि परिसरातील नागरीक उपस्थित होते. यावेळी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिमेला परिवहन बसेसची नागरिकांची मागणी पूर्ण झाल्याचे सांगितले. तर डोंबिवली सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहित भोईर म्हणाले, नागरिकांच्या मागणीला परिवहन व्यवस्थापक मारुती खोडके मंजुरी दिली आहे.त्यामुळे डोंबिवली पश्चिमेला खंड न पडता दररोज ठराविक वेळेत ठराविक बसथांब्यासमोर मिनी बस उभी राहील. जास्तीत जास्त नागरिकांनी बसेस मधून प्रवास करावा. बसेस नसल्याने रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा रिक्षा भाडे आकारतात.आता रिक्षाचालकांची लुट थांबणार आहे. यासाठी वाहतुक पोलीस आपल्या पाठीशी उभे आहेत. नंदू म्हात्रे म्हणाले, प्रशासनाने यात सातत्य ठेवले पाहिजे. पूर्वीचा कोपर ते कुंभारखान पाडा पर्यत मार्ग यात असल्यास नागरीक बसेसमधून प्रवास करण्यास पसंत दर्शवतील.हि नागरिकांची गरज होती. काही मनमानी रिक्षाचालकहि बसेस नसल्याने यांचा फायदा घेत होते.
असा असणार बस मार्ग
डोंबिवली रेल्वे स्थानक, दीनदयाळ रोड वरील गणपती मंदिर, सम्राट हॉटेल, आनंदनगर, रेतीबंदर रोड, गावदेवी मंदिर, सत्यवान चौक, उमेशनगर, `ह` प्रभाग क्षेत्र कार्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, जाधववाडी डोंबिवली ररेल्वे स्थानक..
रिंगरुट…
पहिले फेरी सकाळी ६.४५, दुसरी फेरी सकाळी ७.२० वाजता, तिसरी फेरी ७.५५ वाजता, चौथी फेरी ८.३० वाजता,पाचवी फेरी ९.०५ वाजता, सहावी फेरी ९.४० वाजता,सातवी फेरी १०.४० वाजता , आठवी फेरी ११.१५,नववी फेरी ११.५०, दहावी फेरी १२.२५, अकरावी १३.००. बारावी फेरी १६.०५, तेरावी फेरी १६.४०, चौदावी फेरी १७.१५, पंधरावी फेरी १७.५०, सोळावी फेरी १८.२५, सतरावी फेरी १९.००, अठरावी फेरी २०.००, एकोणावी फेरी २०.३५, विसावी २१.१०, एकविसावी फेरी २१.४५ आणि बाविसावी फेरी २२.२० वाजता होणार आहे.