डोंबिवली ( शंकर जाधव ) : पालिका प्रशासनाणे २७ गावात विकासाच्या नावाखाली अन्यावश्यक प्राकलने ,रस्ता रुंदीकरणाचा धाक दाखवला जात असून भूमिपुत्रांना बांधकामे तोडण्याची धमकी देत पैसे उकळण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आरोप केला आहे .याबाबत पोलीस आयुक्ताना पत्र धाडत २७ गावात अधिकाऱ्यांना गाव बंदी करा , भूमिपुत्रांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांना संरक्षण देऊ नका यापुढे २७ गावात अधिकाऱ्यांनी कोणत्याही बांधकाम किवा बांधकाम व्यावसायिका त्रास दिला तर अधिकऱ्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावात पालिका अधिकाऱ्यांच्या कारभरा बाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहे. अधिकारी कर्मचारी हे या -ना त्या कारणासाठी भूमिपुत्रांना वेठीस धरत असल्याचा आरोपहि केला आहे .याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पोलीस आयुक्ताना पत्र पाठवले असून या पत्रात विकासाच्या नावाखाली अनावश्यक प्राकलने, रस्ता रुंदीकरणाचा धाक दाखविला जात असुन, त्यामध्यमातून मलिदा लाटण्याचा घाट घातला जात आहे. या परिसरातील प्रभाग क्षेत्र अधिकारी हे २७ गावांतील भुमिपुत्रांना बांधकामे ताडण्यासाठी भिती दाखवतात. यापुढे हे अधिकारी २७ गांवामध्ये कोणतेही बांधकाम किंवा बांधकाम व्यावसायीकांना त्रास देण्यासाठी आले, तर त्या अधिकाऱ्यांना त्याची जागा दाखवून त्याला वठणीवर आणण्याचे काम पक्षाचे युवक करतील. तसेच त्यांचा तोंडाला काळे फासण्यात येईल अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण पुरवू नये. अन्यथा कायदा व्यवस्थेचा प्रश्न उद्भल्यास त्यास महापालिका अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.
२७ गावात अधिकाऱ्यांना गाव बंदी करा – राष्ट्रवादीचे पोलीस आयुक्ताना साकडे
