कल्याण : महाराष्ट्र भुषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी कल्याण शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये राबवण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात तब्बल 21 टन कचरा गोळा करण्यात आला. रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या अभियानात १ हजार ९२४ सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
या अभियानादरम्यान शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, नगरसेवक व कार्यालयांतील कर्मचारी व अधिकारीही सहभागी झालेले पाहायला मिळाले. दरवर्षी या प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता अभियानाची मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेत स्मशान भुमी, कनस्तान, दफनभुमी या ठिकाणी सुध्दा स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. त्याच प्रमाणे रक्तदान शिबीर,व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, वृक्ष लागवड व संवर्धन मोहिम, रेन वॉटर हार्वेस्टींग मोहिम, निर्माल्यापासून खत निर्मिती, विहीर जलपुर्नभरण, बस थांबे आणि पाणपोई असे उपक्रमही राबविण्यात येतात.
यावेळी रुक्मिणीबाई हॉस्पीटल,कोळशेवाडी हॉस्पीटल,तहसिलदार कार्यालय, वनविभाग कार्यालय,पोस्ट ऑफिस टिळक चौक,आधारवाडी जेल,आर.टी.ओ. बिर्ला कॉलेज,रेल्वे ऑफिस रिजर्वेशन व चौकशी केंद्र,बाजारपेठ पोलिस स्टेशन, पोलिस कंट्रोल रूम बायले नगर,फायर ब्रिगेड सेंटर, ब प्रभाग क्षेत्र कार्यालय,आय प्रभाग क्षेत्र कार्यालय,अन्सारी चौक हॉस्पीटल,रेल्वे हॉस्पीटल,पंचायत समिती,कल्याण कोर्ट,पोस्ट ऑफिस स्टेशन रोड,एपीएमसी मार्केट,बस स्टॉप, महात्मा फुले पोलिस स्टेशन, कोळशेवाडी पोलिस स्टेशन,टिटवाळा पोलिस स्टेशन,अ प्रभाग क्षेत्र कार्यालय,ड प्रभाग क्षेत्र कार्यालय, जे प्रभाग क्षेत्र कार्यालय याठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये श्रीसदस्यां मार्फत जनजागृती स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ज्यामध्ये १८.३१२ टन सुका तर २.८३४ टन ओला कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती श्री सदस्यांनी दिली.
PHOTO GALLERY :