ठाणे गुन्हा अन्वेषण च्या नावाने हफ्ता वसुली करणार्या वसुलीबाज पोलीस नाईकाला, लाचलुचपत विभागाने केले जेरबंद!
*पोलीस प्रशासनाचे आर्थिक उलाढाली चे भोंगळ कारभार उघड होण्याची शक्यता?
अंबरनाथ(गौतम वाघ) : उल्हासनगर शहरात राजरोस पणे सुरू असलेल्या जुगारांच्या धंद्या वरून प्रती महीना सुरू असलेल्या हफ्ता वसुली च्या लोन चे जाळे कुठ पर्यंत पसरलेले आहे, ह्याचे ओंगळवाणे रूपच ह्या प्रकरणामुळे सदृश्य झाले आहे. उल्हासनगर नं ५, साईनाथ नगर येथील जुगाराचा धंदा चालवणार्या व्यक्ती कडून मध्यवर्ती पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक प्रशांत चतुर्भुज याला सायंकाळी ८.३० वा अंबरनाथ येथील शिवगंगा नगर परिसरात, ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
१ लाख ४०,०००/- रूपयांची ठाणे गुन्हे पोलीसांच्या नावे मागणी करत होता. ह्या प्रकरणामुळे शहरात सुरू असलेल्या जुगाराच्या धंद्यांवरून होणारी काळी कमाई प्रकाश झोतात आली असून पोलीस प्रशासनाचे आर्थिक उलाढाली चे भोंगळ कारभार उघड झाले आहेत.