ठाणे : लेक माहेरचा कट्टा महिलांसाठी हा फेसबुक वरील सर्वात मोठा समूह आहे. याबल समूहावर २,६५००० महिला असून या समूहाचे संचालक ०९जणी असून या सर्व गृहिणी आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे सारिका प्रमोद ढाणे,पूनम दुसाने,वर्षा नागरे,कौसर शेख,कविता कोंडभर,राजश्री थोरात,सौजण्या गिरी,नीलम विसपुते,सुनंदा सुरवसे , समूहाचे अनेक कार्यक्रम होत असतात,या समूहाला अनेक पुरस्कार मिळाले या समूहांतर्गत महिलांना सामाजिक,आर्थिक,भावणीक,कौटुंबिक,कायदेविषयक,आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि मदत केली जाते.
सहयोग मंदिर हॉल मध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली. रामदास बिवलकर, विकास इंगळे (फोटोग्राफी अकॅडमी),अनिल पाटील (उद्योजक ग्रुप), राहुल मळगावकर(वास्तुतज्ञ), रंजना सडोलीकर (सोशल वर्कर),राहुल केनिया(बिर्ला मुच्युल), राज ठाकरे(पॅशन टीम),संकेत,संगीता लावणीकर (जज),स्वप्नाली (नाटक मिटु) जज, गौरी (सौंदर्यवती), सायली विसपुते (कथक विशारद) जज त्याचप्रमाणे कार्यक्रमामध्ये नृत्य स्पर्धा आणि नववधू स्पर्धा आयोजित केली गेली. या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे नृत्य स्पर्धेत आणि नववधू स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला त्यातील बऱ्याच स्पर्धक ४० वर्ष वयाच्या होत्या, कार्यक्रमामध्ये १५० च्या वर महिलांनी उपस्थिती दाखवली,कार्यक्रमामध्ये अनेक छोट्या छोट्या स्पर्धा घेतल्या गेल्या तसेच स्नॅक्स ठेवण्यात आला होते.महिलांसाठी रिटर्न गिफ्ट म्हणुन वेगवेगळ्या वस्तू देण्यात आल्या,अवनी जोशी यांनी अडमिन्स साठी स्वतः बनवलेलं रांगोळी ठसे आणले,शनया मसाले बनवणाऱ्या कंपनी ने सर्व महिलांसाठी मसाले दिले लकी ड्रॉ मध्ये रोहिता गणेश सातारकर यांना पैठणी मिळाली तर सरप्राईझ खेळामध्ये निलम गणेश पुजारी व पुजा मोरे गिफ्ट मिळाले. यांना आशा प्रकारे कार्यक्रम झाला,आणि महिलांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
तसेच हे फोटो विकास इंगळे सर यांच्या फोटोग्राफी अकादमी द्वारे काढण्यात आले आहेत आणि खूप उत्कृष्ट असे फोटो त्यांनी काढून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद ४K चॅनेलचे संपादक यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमध्ये उपस्थिती दाखवून सर्व कार्यक्रम स्वतःच्या चॅनेल वर प्रक्षेपित केला त्याबद्दल धन्यवाद नेहा पगारे यांच्या मुलाने सुद्धा फोटो काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली.