मुंबई

महिला दिनी पोलीस पत्नीचे नवनिर्वाचीत पोलीस आयुक्तांना साकडं

मुंबई  :  मुंबई पोलीस दलाचे तत्कालीन आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी सन 2016 साली मुंबई पोलिसांचे कर्तव्य 8 तासांचे केले. “कर्तव्याचे 8 तास” हा फॉर्मुला देवनार पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस शिपाई रवींद्र पाटील यांनी अगदी अचूक तयार केला होता. या फॉर्मुल्याची अंमलबजावनी देवनार पोलीस ठाण्यापासून करण्यात आली अन् बघता बघता सबंध मुंबई पोलीस खात्यात 8 तासांचे कर्तव्य राबवले गेले. मात्र गेल्या दोन – अडीज महिन्यांपासून मुंबईतील काही पोलीस ठाण्यांमध्ये 8 तासांचे कर्तव्य बजावले जात नाही, हे दिंडोशी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या पत्नीमुळे उघडकीस आले. या पोलीस पत्नीने महिला दिनाचे औचित्य साधून नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना पुन्हा 8 तास कर्तव्याची अंमलबजावनी करण्यासाठी ई-मेलद्वारे साकडे घातले आहे.

8 तास कर्तव्यामुळे मुंबई पोलीस दलात कमालीचा बदल पाहावयास मिळाला. घरातला कर्ता पोलीस पुरुष व पोलीस महिला वेळेवर घरी येऊ लागले. परिणामी पोलीस कुटुंबीयांना वेळ देऊ लागले. मुलांचा अभ्यास असो वा अन्य काही… सर्वांसाठी वेळ देता येत असल्यामुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दुसरीकडे 8 तास कर्तव्यामुळे पोलिसांना वेळच्या वेळी जेवण, पुरेशी झोप, व्यायाम करण्यासाठी वेळ मिळू लागल्याने त्यांचे आरोग्य चांगले राहू लागले. पोलिसांमध्ये आजारी पडण्याचे, मृत्यूचे प्रमाण कमी झाले. भविष्याच्या दृष्टीने जीवघेणे आजारांवर पोलिसांना मात करता आली. हे केवळ 8 तासांमुळे शक्य झाले. सर्वात महत्त्वाचे जे पोलीस दाम्पत्य अथवा पोलीस खात्यात व अन्य ठिकाणी नोकरी करत असल्यामुळे त्यांना पोटच्या लहान मुलांना पाळणाघरात ठेवावे लागत होते. पण 8 तास ड्युटीमुळे मुलांना पाळणाघरात ठेवणे बंद करून पोलीस त्यांचे संगोपन करू लागले.
सर्व सुरळीत असताना काही वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे 8 तासांचे कर्तव्य बंद झाले. त्यामुळे मागचे वाईट दिवस पुन्हा पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या वाट्याला आले. ही परिस्थिती लक्षात घेऊन दिंडोशी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलिसाची पत्नी सौ. स्वाती उमेश शेरलेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना ई-मेल धाडला. त्यात दिंडोशी पोलीस ठाण्यात बंद करण्यात आलेल्या 8 तास कर्तव्याबाबत व्यथा मांडली. 8 तास कर्तव्य मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यात सुरु करण्याची मागणी केली.
खरं पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने पोलीस दलाच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणींकडे लक्ष दिले पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा कामाचा आठवडा करण्यात आला. जन सरक्षेचा विडा उचललेले पोलीस बांधव चोख कर्तव्य बजावून कायदा व सुव्यवस्था भंग होऊ देत नाही.
ठाकरे सरकार, तुम्हीच सांगताना, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. या सर्वसामान्यांमध्ये पोलीस व त्यांचे कुटुंबीयही येतात, हे विसरू चालणार नाही. 8 तास कर्तव्य कायम (जीआर काढून) करावे. 8 तास कर्तव्याचा हा निर्णय खऱ्या अर्थाने पोलीस पत्नींना, पोलीस कन्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ठरतील!

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!