डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून डोंबिवलीत ३१ मार्चपर्यत रिक्षा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मात्र काही रिक्षाचालक आदेशाला जुमानता रिक्षा रस्त्यावर धावत होत्या.अश्या रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.सुमारे 20 रिक्षा जप्त करून त्या वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेच्या आवारात उभ्या केल्या आहेत.याबाबत अधिक देताना वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निघोट म्हणाले, जनतेच्या आरोग्यसाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे प्रत्येकाने पालन केले पाहिजे.पुढील आदेश येईपर्यत शहरातील रिक्षा बंद ठेवण्याचे आदेश आहेत.प्रामाणिक रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षा बंद ठेवल्या आहेत.मात्र काही रिक्षाचालकांनी रिक्षा सुरू ठेवल्या होत्या.अश्या रिक्षाचालकांच्या रिक्षा जप्त करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.त्यामुळे रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवाव्यात हा उद्देश आहे.मात्र रुग्ण, आजारी व्यक्ती आणि अपंगांना रिक्षातून प्रवास करण्यास परवानगी आहे.याची खातरजमा करूनच रिक्षा पुढे जाऊ दिल्या जातात.जनतेने सहकार्य करावे असे आवाहन निघोट यांनी केले आहे.
आदेशाचे पालन न करणाऱ्या डोंबिवलीतील रिक्षाचालकांच्या रिक्षा जप्त….
March 21, 2020
685 Views
1 Min Read

-
Share This!
You may also like
Aapale Shahar
-
Share This!