डोंबिवली ( शंकर जाधव ) : प्रवास टाळा या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मुंबईकर आणि आसपासच्या उपनगरातील प्रवाशांनी प्रतिसाद दिला आहे. डोंबिवली येथील तिकीट खिडकीतून२४ तासात फक्त दहा हजार तिकिट विक्री झाली आहे.तर वेंडिंग मशीनद्वारे १५हजार विक्री झाल्याचे डोंबिवली रेल्वे वाणिज्यिक विभागातून सांगण्यात आले.सकाळपासून डोंबिवलीतील सर्व फलाटावर प्रवाशांची तुरळक संख्या दिसून येत होती.
जगभरात हाह:कार माजवणाºया कोरोना व्हायरसचा प्रसार भारतात होऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यांच्या आवाहनाला मुंबई आणि ठाणे येथील महत्त्वाचे उपनगर असणाºया डोंबिवली शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डोंबिवली शहर हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दिवसरात्र या स्थानकावर तेवढीच गर्दी असते. मात्र सध्या कोरोना व्हायरसमुळे या गर्दीचे प्रमाण रोडावल्याचे दिसून येत आहे. १ मार्च रोजी लोकलने प्रवास करण्यासाठी आरक्षण खिडकीवरून २० हजार ४१ तिकीटे खरेदी झाली होती. तर त्याच दिवशी वेंडीग मशीनद्वारे २८ हजार ७१० तिकीटांची खरेदी करण्यात आली होती, मात्र २१ मार्च रोजी लोकलने प्रवास करण्यासाठी १० हजार तिकीटे आरक्षण खिडकीवरून करण्यात आली. तर वेंडीग मशिनद्वारे १५ हजार तिकीटे खरेदी केली आहेत. तिकीट खिडकीतून दहा लाख रुपये जमा झाले असून, आगावु आरक्षणातून फक्त ९ हजार रूपये जमा झाले आहेत.कोरोना हाहाकार मुळे प्रवास टाळला असून दर सोमवारी ३० लाखावर डोंबिवली स्थानकातून रक्कम जमा होते.तर ८० हजारापासून ते ६ लाखापर्यंत आगावु आरक्षण रक्कम सुट्यांच्या मोसमात जमा होत असल्याचे रेल्वे प्रशासना कडून सांगण्यात आले.
डोंबिवली तिकीट खिडकीतून२४ तासात फक्त दहा हजार तिकिट विक्री
