डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोरिनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यासाठी शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्या.त्यामुळे १० वीतील विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या ताणानंतर आता पायपीट करत परीक्षा केंद्रापर्यत जावे लागले.काही विद्यार्थी एकत्र येत परीक्षा केंद्रापर्यत गप्पा मारत मारत चालत होते.परंतु या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रपर्यत जाण्यासाठी रिक्षाला परवानगी हवी होती असे पालकांचे म्हणणे आहे.तर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रापर्यत जाण्यासाठी पोलिसांनी मदत करायला हवी होती अशी प्रतिक्रिया दिली.तर खाजगी वाहनांना बंदी असल्याने विद्यार्थ्याना मदत म्हणून कोणी पुढे आले का आले नाही असे विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केला.
१० वीचे विद्यार्थी पायपीट करत परीक्षा केंद्रापर्यत
March 21, 2020
45 Views
1 Min Read

-
Share This!