ठाणे

रोजंदारीवर काम करणाऱ्यांकरिता शिवसेनेचा अनोखा उपक्रम ; लोकप्रतिनिधी / समाजसेवकानी पुढाकार घ्यावा

कल्याण  : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. मात्र जे लोक निराधार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडतात. त्यांचं काय होणार. यावर उपाय म्हणून शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेच्या वतीने फूड पॅकेटची गाडी गेल्या तीन दिवसापासून कार्यरत आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या पोटाची भूक भागविण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून कल्याणमध्ये फूड पॅकेटचे वाटप केले जात आहे. त्यांना त्यांच्या जीवाची पर्वा नसून भुकेल्यांसाठी त्यांची गाडी फिरतेय.

शहरात अत्यावश्यक सेवा वगळता काही एक सुरु नाही. अशा परिस्थितीत शिवसेनेचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर व शिवसेनेच्या वतीने फूड पॅकेटची गाडी गेल्या तीन दिवसापासून शहरात फिरते आहे. सोमवारी या गाडीतून 1 हजार जणांना फूड पॅकेट वाटप करण्यात आले आहे. काल मंगळवारी व आज बुधवारी ही फूड पॅकेट वाटप केले गेले. बेघर, हातावर पोट असलेले नाका कामगार यांना अन्नाचे वाटप केले जात आहे. अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडलेले सरकारी कर्मचारी यांनाही जेवण दिले जात आहे.

कल्याणच्या रेतीबंदर, बस स्टैंड, स्टेशन परिसर, पोलिस, आरपीएफचे जवान, रुक्मीणीबाई रुग्णालय याठिकाणी फूट पॅकेटचे वाटप केले गेले. हे काम शिवसेना नगरसेवक सचिन बासरे व शिवसैनिक वंडार कारभारी, सशांक भोईर, जयेश लोखंडे, योगेश पष्टे, बाळा भोईर ही मंडळी करीत आहेत. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने केलेल्या आवाहनानुसार सगळे लोक घरात बसलेले असताना ही मंडळी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता भुकेल्यांना अन्न वाटप करीत फिरत आहेत. त्यांच्या या कामाचे सगळीकडे कौतूक होत आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!