ठाणे : कोव्हीड-19 निर्मुलनासाठी शासनाने दि. 14 एप्रिल पर्यंत लॉगडाऊन घोषित केली असून कलम 144 लागु करून संचारबंदी लागु केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनतेने घराबाहेर न पडणे, गर्दी निर्माण करणाऱ्या घटना टाळाव्यात याबाबत दक्षता घेणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र भाजीपाला, किराणा इ. खरेदीसाठी दुकानात गर्दी निर्माण होत आहे. यातून विषाणूला प्रतिबंध होणे शक्य नाही. तरी सदरचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांवर यांच्या संस्थेतील सभासद जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी टाळण्याची जबाबदारी सोपविण्यात येऊन त्यानुसार प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे जबाबदारी पार पाडण्यासाठीचे आदेश देण्यात येत आहेत. संस्थेच्या गेट जवळ सॅनिटायझरर्स ठेऊन प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात स्वच्छ करूनच सोसायटीमध्ये प्रवेश द्यावा. इंटरकॉमव्दारे प्रत्येक सदस्यास आवश्यक असणाऱ्या किराणा, भाजीपाला इ. गोष्टीची मागणी गोळा करावी व त्यानुसार जवळच्या किराणा, भाजीपाला वगैरे जीवनावश्यक वस्तुची ऑर्डर ( सदस्य निहाय) देऊन सामान सोसायटीच्या गेटवरतीच मागवुन घेणे. एकेका सदस्याच्या घरी सिक्युरिटी मार्फत सदरचे सामान पोहचवावे वा प्रत्येक घरातील 1 सदस्यास बोलवून गेटवरती सदर सामानाचे वाटप करावे मात्र हे करताना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. सोसायटीतील सदस्य तातडीच्या न टाळता येणाऱ्या कारणाशिवाय बाहेर जाणार नाहीत याची दक्षता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने घ्यावी. तसेच सोसायटीच्या क्लब हाऊस, बगीचा येथे सदस्य वा लहान मुले एकत्र येणार नाही याबाबत योग्य ती दक्षता वा प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.
गृहनिर्माण संस्थांसाठी आवाहन
March 27, 2020
61 Views
2 Min Read

-
Share This!