ठाणे

दिव्यात पाणी टंचाई !! पाणी पुरवठा करण्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवावी.

नागरिक घरीच असल्याने आर्थिक अडचणीमुळे खासगी पाणी टँकर विकत घेणे होतेय अशक्य

दिवा :    दिव्यात आधीच मागील वर्षभर पाणी टंचाई असताना आता कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना संचारबंदी मुळे अधिक तीव्रतेने पाणी समस्येचा सामना करावा लागत असून अनेक नागरिक घरीच असल्याने टँकर चे विकतचे पाणी घेणे शक्य नसल्याने ठाणे महापालिका प्रशासनाने दिव्यातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी यंत्रणा राबवावी अशी मागणी भाजपचे माजी सरचिटणीस व सेव्ह दिवा फाउंडेशन चे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

दिव्यातील नागरिक सरकारच्या नियमांचे पालन करत आहेत.संपूर्ण दिव्यात लॉक डाऊन असताना नागरिकांनी आपल्या इमारती ही लॉक डाऊन केल्या आहेत.दिव्यात पाणी समस्या आधीच गंभीर आहे.अनेक नागरिक हे पिण्याचे पाणी टँकर द्वारे घेत असतात.मात्र आता नागरिक घरीच थांबणार असल्याने आर्थिक संकट देखील निर्माण झाले आहे.त्यात पालिकेच्या पाणी पुरवठा बाबत दिव्यात सावळा गोंधळ आहे.परिणामी दिव्यात नागरिकांना गरजे पुरते पाणी मिळणे आवश्यक असून पालिकेने हा विषय लक्षात घेऊन नागरिकांना प्रत्येक सोसायटी नुसार येते काही दिवस मोफत पाणी पुरवठा करावा अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे.दिव्यात पालिकेच्या पाणी पुरवठा लाईन ला अनेक परिसरात पाणी येत नाही तर काही ठिकाणी दोन तीन दिवसांनी पाणी येते अशा स्थितीत लोकांनी काय करायचे हा प्रश्न आहे असे सांगत पालिकेने दिव्यातील नागरिकांना पुढील 2 आठवडे मोफत पाणी पुरवठा टँकर द्वारे करावा अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!