ठाणे

युद्धपातळीवर शहर निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम सुरू ; कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईटची फवारणी.

ठाणे (संतोष पडवळ ) : शहरातील दुकाने, मेडिकलशॉप, बसस्टॉप, रुग्णालये व कार्यालये 10 ट्रॅक्टर्स,10 बोलेरो ,10 अग्निशमनदलाची वाहने, 110 हॅण्डपंपाद्वारे 1230 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचा वापर करून जवळपास 12,300 लिटर औषधाची फवारणी करण्यात आली. दरम्यान महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

निर्जंतुकीरणाची व्यापकता आणि तीव्रता वाढावी या पार्श्वभूमीवर टाटा एसीईची 5 वाहने व 5 बोलेरो ही १० अतिरिक्त वाहने या मोहिमेत सहभागी करून स्प्रेईंगची क्षमता वाढविण्यात येत आहे. आज 1230 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचे 1:10 हे प्रमाण घेवून 12,300 लिटर सोडियम हायपोक्लोराईटचे स्प्रेईंग शहरातील दुकाने, मेडिकलशॉप, बसस्टॉप, रुग्णालये व कार्यालये आदी ठिकाणी करण्यात आले.

करोना ( कोविड – १९ ) बाबत प्रतिबंधक उपाययोजनेसाठी प्रत्येक प्रभाग समिती निहाय कृती आराखडा तयार करण्यात आला असून ट्रॅक्टर / बोलेरो जीप जेट स्प्रेव्दारे सोडियम हायपोक्लोराईटने संपूर्ण शहर निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!