महाराष्ट्र

लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे प्रयत्न

मुंबई, दि. 27 : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे विमानसेवा बंद असल्याने युरोप खंडातील लॅटव्हियाची राजधानी रीगा विमानतळावर भारतातील 37 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांनामायदेशी परतण्यासाठी केंद्र शासनाशी संपर्क सुरु आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालय, विदेश मंत्रालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

श्री.सामंत म्हणाले, रीगा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना तिथे कोणत्याही स्वरूपाची मदत अथवा आरोग्याच्या दृष्टीने कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याकारणाने त्या विद्यार्थ्यांनी भीतीपोटी माझ्याशी संपर्क केला आहे.

विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवर संपर्क झाला. सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी राज्यशासन केंद्र शासनाच्या मदतीने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

भारतातील 37 विद्यार्थी असून महाराष्ट्रातील 8 विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. या सर्वांना मायदेशी परतण्यासाठी तातडीने मदत करण्यात येईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काळजी करू नये, शासन आपल्याला मदत करेल, असा विश्वासही विद्यार्थ्यांना श्री. सामंत यांनी दिला.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!