ठाणे

ठाणे पालिकेच्या पुढाकाराने भिकारी, मजुर, स्थलांतरित कामगारांसाठी स्टेडियमसह 9 ठिकाणी निवारा केंद्रे

ठाणे (30 मार्च, संतोष पडवळ ) कोरोनाच्या वाढता प्रार्दभाव लक्षात घेऊन देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे भिकारी, रोजदांरीवर काम करणारे कामगार, बेघर, मजुर आणि स्थलांतरित कामगार यांच्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहासह विविध 9 प्रभाग समितीमध्ये एकूण 9 निवारा केंद्रे निर्माण केली आहेत.

त्यानुसार महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रिडा प्रेक्षागृहामध्ये तब्बल 220 व्यक्तींची व्यवस्था केली आहे. याठिकाणी त्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था महापालिका स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून करीत आहे. तसेच प्रभागसमितीनिहाय महापालिकेच्या शाळांमध्ये 9 ठिकाणी ही निवारा केंद्रे कार्यान्वित करण्यासाठी वर्ग खोल्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तसेच पोलिसांच्या मदतीने या सर्व मजुर, कामगार, भिकारी यांचे लॉकडाऊनच्या काळात हाल होऊ नयेत या उद्देशाने पालिकेने ही पावले उचलली आहेत. त्या अनुंषगाने पालिकेने शहरातील दादोजी कोंडेदव क्रिडागृहात तब्बल 220 नागरीकांची या पध्दतीने व्यवस्था केली आहे. त्यांना चहा, नाष्टा, जेवण आदींचीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे महापालिका आयुक्त विजय सिघंल यांच्या आदेशान्वये ही कार्यावाही करण्यात आली आहे.
महापालिकेच्यावतीने शहरातील 9 प्रभाग समिती हद्दीमधील महापालिका शाळांच्या वर्गखोल्या यासाठी तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार उथळसर प्रभाग समितीतंर्गत टेंभी नाका शाळा क्र.5 च्या 8 वर्ग खोल्या, राबोडी शाळा क्र.11 मध्ये 15, शाळा क्र.37 मध्ये 07 नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत शाळा क्र. 17 मध्ये 07, पारशीवाडी शाळा क्र. 34 मध्ये 10, परबवाडी शाळा क्र. 18 मध्ये 08, कळवा प्रभाग समितीतंर्गत घोलाईनगर शाळा क्रमांक 4 मध्ये 11, आनंद नगर शाळा क्रं.27 मध्ये 08, आतकोनेश्वर नगर शाळा क्रं. 28 मध्ये 07, कळवा शाळा क्रमांक 2 मध्ये 20, विटावा शाळा क्रमांक 18 मध्ये 18 वर्ग खोल्या आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये अचानक नगर शाळा क्र. 78 मध्ये 08, मुंब्रा देवी रोड, मुंब्रा शाळा क्र. 124 मध्ये 15, मुंब्रा मार्केट शाळा क्र.13 व 75 मध्ये 23 वर्ग खोल्या, तर वागळे प्रभाग समितीत किसननगर शाळा क्र. 21 मध्ये 51, शांतीनगर शाळा क्र.42 मध्ये 23, हाजुरी शाळा क्र. 32 मध्ये 10, हाजुरी शाळा क्र. 39 मध्ये 12, दिवामध्ये दातिवली शाळा क्र. 94 मध्ये 08, दिवा शाळा क्र. 79 मध्ये 11, शिळगाव शाळा क्र. 26 मध्ये 14, 87 मध्ये 10, दोसाई वेताळपाडा शाळा क्रमांक 87 मध्ये 10, खडीपाडा शाळा क्रमांक 85 मध्ये 8, डायघर शाळा क्रमांक 91 मध्ये 08, शिमला पार्क शाळा क्रं. 31 आणि 12 मध्ये 60 वर्ग खोल्या ठेवण्यात आल्या आहेत.
माजिवडा मानपाडा प्रभाग समितीत शाळा क्रं. 43 मध्ये 09, बाळकुम शाळा क्र. 60 मध्ये 21, कोलशेत शाळा क्र. 52 मध्ये 10, पातलीपाडा शाळा क्र. 25 मध्ये 21, आझादनगर शाळा क्रं. 55 मध्ये 07, ढोकाळी शाळा क्रं.61 मध्ये 15, कासारवडवली शाळा क्रं. 62 मध्ये 11, मनोरमानगर शाळा क्रं.128 मध्ये 16, मानपाडा शाळा क्रं.07 मध्ये 12 वर्कनगर प्रभाग समितीतंर्गत वर्तकनगर शाळा क्रं. 44 मध्ये 24, येऊर शाळा क्रं.65 मध्ये 08, शिवाईनगर शाळा क्रं. 47 मध्ये 12 लोकमान्य नगर-सावरकर नगरमध्ये सावलकर नगर शाळा क्रं. 120 मध्ये 24, लोकमान्यनगर शाळा क्रं. 46 मध्ये 11 आणि काजुवाडी शाळा क्र. 95 मध्ये 19 वर्गखोल्या ठेवण्यात आल्या आहेत.
या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. त्यांच्या देखरेखेखाली या ठिकाणी येणा:या प्रत्येकाच्या निवा:याची सोय करतांना त्यांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!