महाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ९३ कोटी जमा

मुंबई दि  31: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा  मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात  दानशूर व्यक्ती व् संस्थानी आपले योगदान द्यावे असे आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या तीन दिवसांत 93 कोटी 5 लाख रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

आज प्रामुख्याने शिर्डी संस्थानाने 51 कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी एक दिवसाच्या वेतनपोटी 11 कोटी रुपये, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरने 1 कोटी रुपये दिले

मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19

कोविड  19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 

Chief Minister’s Relief Fund-COVID 19

Savings Bank Account number 39239591720

State Bank of India,

Mumbai Main Branch, 

Fort Mumbai 400023

Branch Code 00300

IFSC CODE- SBIN0000300

मराठीत-

मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19

बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720

स्टेट बँक ऑफ इंडिया,

मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023

शाखा कोड 00300

आयएफएससी कोड SBIN0000300

सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!