भिवंडी : [ प्रतिनिधी मिलिंद जाधव ] पूर्ण देशात कोरोना विषाणू या रोगाने थैमान घातले असून त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील संपूर्ण शाळांना सुट्टी घोषित केली. म्हणून शाळेत पोषण आहार योजनेअंतर्गत उर्वरित तांदूळ व डाळ असलेले कडधान्य वर्ग पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांना वाटप करावे असे आदेश दिले आहेत. त्या आदेशाचे पालन करीत भिवंडी तालुक्यातील पडघा केंद्रातील जिल्हा परिषद समतानगर, बोरिवली मराठी शाळेच्या वतिने शालेय पोषण आहार अंतर्गत शिल्लक तांदूळ व डाळी कडधान्य शाळेतील पाहिले ते चौथीतील विद्यार्थ्यांच्या १८ पालकांना वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, शाळा व्यवस्थापव्यवस्थापन समिती अध्यक्षा रश्मी दोंदे यांच्या हस्ते शिल्लक असलेला तांदूळ,डाळी कडधान्य सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांना एक मीटर अंतरावर वाटप करण्यात आले.
शालेय पोषण आहार अंतर्गत पालकांना शिल्लक कडधान्य वाटप
April 1, 2020
45 Views
1 Min Read

-
Share This!