ठाणे, दि. 3 : ठाण्यातील 95 वर्षे क्रीडा, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेली श्री मावळी मंडळ संस्था गेली 70 वर्षे शिवजयंतीनिमित्त राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा भरवत आहे. परंतु या वर्षी आपल्या देशावर आलेल्या करोना विषाणूच्या संकटामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. संस्थेने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा जमा निधी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी व स्थलांतरित गरीब कामगार वर्गासाठी मुख्यमंत्री फंडांमध्ये रू 10 लाखांचा धनादेश ठाणे जिल्हाधिकारी मा. श्री. राजेश नार्वेकर ह्यांच्याकडे सुपूर्द केला. सदर धनादेश संस्थेचे विश्वस्त श्र्जोसेफ फर्नांडीस यांच्याहस्ते जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर मोरे, अध्यक्ष कृष्णा डोंगरे आदी उपस्थित होते.
श्री मावळी मंडळ संस्थेने कबड्डी स्पर्धेचा जमा निधी मुख्यमंत्री फंडाला दिला
April 3, 2020
25 Views
1 Min Read

-
Share This!