ठाणे

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप महापालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे महापालिकेचे आवाहन.

ठाणे ( संतोष पडवळ ) : कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने जाहिर केलेल्या संचारबंदी कालावधीत ठाणे शहरातील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना (हालचाल न करु शकणाऱ्या) जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींनी ठाणे महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्र. 1800-222-108 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी केले आहे.

संचारबंदीच्या कालावधीमध्ये सर्वसामान्य माणूस जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करुन घेवू शकतो परंतु यामध्ये ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींना (हालचाल न करु शकणाऱ्या) अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, अशा प्रकारच्या नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी महापालिकेने मदत केंद्र सुरू केले असून या मदतकेंद्राच्या माध्यमातून ज्येषठ नागरिक व दिव्यांगांचा शोध घेवून त्यांना जीवनावश्यक वस्तू वा भोजन तसेच वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली आहे.

तरी महापालिका कार्यक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व दिव्‌यांग व्यकती यांनी महापालिकेच्या 1800-222-108 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा दिक्षीत 022-25331211-166, सहाय्यक समन्वय अधिकारी दयानंद गुंडप 9619004055 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!