ठाणे

ठाणे महापालिका आयुक्त विजय सिंघल यांची आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट.

ठाणे ता ६ (संतोष पडवळ) :  महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी आज महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देवून कोरोना कोवीड १९ पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणा-या कामकाजाचा आढावा घेतला.

श्री. सिंघल यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे काम कशा प्रकारे चालते याची माहिती घेतली तसेच कोणत्या प्रकारचे कॅाल्स येतात, कोरोना विषयाचे किती कॅाल्स येतात याचा आढावा घेवून तेथे नियुक्त असलेल्या वैद्यकीय अधिका-यांशी चर्चा केली.
त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये असलेल्या सुविधांचा अभ्यास करून या ठिकाणी काय करता येईल याची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम आदी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!