अंबरनाथ दि. ०८ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कोरोनासारख्या भयंकर आजाराने मोठे संकट उभे राहिल्याने अंबरनाथ तालुक्यात कामगार,आदिवासी,सर्वसामान्य भागातील लोकांचा अन्नधान्यांचा प्रश्न ऎरणीवर आला आहे.याचे गांभीर्य लक्षात ठेऊन डि.वाय.फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक दयानंद चोरघे यांच्या मार्गदशनाखाली गोरगरिब आदिवासी कुटूंबाना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप अंबरनाथ नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा बांधकाम समिती सभापती करुणा कृष्णा रसाळ पाटील यांच्या माध्यमातुन डि.वाय.फाऊंडेशन अंबरनाथ तालुकाध्यक्ष अॅड.रोहन रसाळ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.हा तावर पोट अशी परिस्थिती कामगार व सर्वसामान्य जनतेची असते.त्यामुळे काही दिवसांपुर्वी लाॅकडाऊन झाल्याने त्यांच्या दैनंदिन जिवनावर संक्रांतच आली होती. कोरोना सारख्या भयंकर विषाणुला हद्दपार करण्यासाठी चांगलाच संकल्प डि.वाय.फाऊंडेशनचे तालुकाध्यक्ष अॅड.रोहन रसाळ पाटील केला आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या प्रभाग ३ मधील सर्व सामान्य गरजु आदिवासी कुटूंबांना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. यामध्ये तांदुळ,डाळ,तेल,कांदे,बटाटे,मसा ला,हळद,मिठ,साबण इत्यादी जिवनावश्यक वस्तुंचा समावेश होता.वस्तुंचे वाटप करतांना विशेषता मास्क,सेनिटाईजरचा योग्य वापर करुन कोरोना सारख्या आजारापासुन कसे सुरक्षित राहता येईल यासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले.