डोंबिवली ( शंकर जाधव ) : करोनाच्या टाळेबंदीतून गरजूना अन्नधान्य उपलब्ध व्हावे याकरिता बांधकाम व्यावसायिकांची संघटना असलेल्या महाराष्ट्र चेंबर हाउसिंग इंडस्ट्रीज (एम सी एच आय) च्या वतीने कल्याण डोंबिवली महापालिकेस गरजूना मोफत वाटप करण्यासाठी अन्नधान्य देण्यात आले. एम सी एच आय च्या डोंबिवली विभागाच्या वतीने पालिकेस अन्नधान्य सुपुर्द करण्यात आले.यावेळी डोंबिवली येथील पालिकेच्या विभागीय कार्यालयातील ग प्रभागाच्या प्रभाग क्षेत्र अधिकारी इंद्रायणी कचरे, फ प्रभाग अधिकारी राजेश सावंत, एमसीएचआय डोंबिवली विभागाचे मोहित भोईर, फेरिवाला अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख रमाकांत जोशी उपस्थित होते.कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या प्रशासकीय मार्गदर्शन नुसार करोनाविरोधात झुंज सुरु आहे.टाळेबंदीतून डोंबिवलीत गरिबांच्या उपजिविकेची समस्या उभी राहणार आहे. एम सी सी एच आय कडून दहा टन डाळ तांदूळ देण्यात आले.पालिका योग्य नियोजन करुन त्याचे वाटप करतील.असे मोहित भोईर म्हणाले.
एमसीएचआयच्या वतीने पालिकेस दहा टन अन्नधान्य
April 9, 2020
21 Views
1 Min Read

-
Share This!
You may also like
Aapale Shahar
-
Share This!