नगरसेवक सचिन पाटील यांच्याकडून अन्नदानाचे वाटप
अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपुर्ण देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आल्याने अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड क्र. ५७ मधील काही गोरगरीब, कामगार व रोजंदारीवर अवलंबित असलेल्या लोकांना कामधंदा नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. हि बाब येथील स्थानिक नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांच्या निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून अंबरनाथ पूर्वेकडील सचिन हॉटेल, आनंदनगर, एमआयडीसी याठिकाणी मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप करण्यात आले असून आजच्या पहिल्या दिवशी सुमारे १२०० ते १३०० नागरिकांना व कामगारांना मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप करण्यात आल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली. याप्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव (मामा) पाटील, “आमा”चे उमेश तायडे, व्हर्टिव कंपनीचे मॅनेजर मंगेश सावंत, बाळाशेट जाधव, विजय सावंत ,जगदीश तांबे, जीवन पाटील, अंकुश फुलोरे, अमर इचके, हर्षल भोईर, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, याअगोदरही वॉर्ड क्रं. ५७ मधील गोरगरीब नागरिकांना व आदिवासी वाडी आणि पाड्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. या व्यतिरिक्त प्रभागातील काही गोरगरीब नागरिक, कामगार व रोजंदारीवर अवलंबित असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांच्याकरिता आजपासून १४ एप्रिलपर्यंत मोफत अन्नदान (जेवणाचे) वाटप करण्यात येणार असल्याचे नगरसेवक सचिन पाटील यांनी सांगितले.