ठाणे

भाजपच्या वतीने डोंबिवलीत रिक्षाचालकांना धान्य वाटप

डोंबिवली ( शंकर जाधव)  : कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन करण्यात आले आहे. हातावर पोट असणाऱ्या मजूर, रिक्षाचालक आणि कामगारांचे यात हाल होत असले तरी या सर्वांनी घरात राहून आपल्या कुटुंबीयांना आणि नागरिकांना सुरक्षित ठेवले आहे.त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटात भाजप मदतीला धावून आली आहे.भारतीय जनता पार्टी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या  मार्गदर्शनाखाली जिल्हाअध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब , डोंबिवली शहर अध्यक्ष नंदू जोशी , , भाजप प्रणित रिक्षा चालक- मालक संघटनेचे कार्याध्यक्ष संजय देसले यांच्या प्रयत्नाने डोंबिवली
रिक्षाचालकांना धान्य वाटप करण्यात आले.यावेळी रिक्षाचालकांनी भाजपचे आभार मानत जगातून कोरोना लवकरात लवकर निघून जाऊ दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!