डोंबिवली ( शंकर जाधव ) : टाळेबंदी झाल्यामुळे डोंबिवलीतील विविध वस्त्यांमध्यील नागरिकांना अन्न धान्य उपलब्ध व्हावे याकरिता रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे डोंबिवली शहर शाखेच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या हस्ते विविध ठिकाणी तेल धान्य वाटप करण्यात आले.तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी सँनीटायझर, मास्क देखील देण्यात आले आहेत.
यावेळी डोंबिवली युवक .आघाडी अध्यक्ष.सतीश पवार , कार्याध्यक्ष किशोर मगरे, समाधान तायडे, वार्ड अध्यक्ष तेजस जोंधळे, राजेश भालेराव, प्रभुजी फुले, धम्मपाल सरकटे.राजू दादा खिल्लारे डॉ.संदीप पाईकराव अमोल मोरे, भारत भालेराव आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी अंकुश गायकवाड म्हणाले कि, डोंबिवलीतील विविध वस्तीतील नागरिकप्रामुख्याने रोजंदारीवर पोट भरणारा आहे.करोना सुरक्षेसाठी टाळेबंदीतून यांचा रोजगार बंद झाला आहे.त्याचप्रमाणे दुकाने बंद असल्याने अन्नधान्य समस्या मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे.त्या साठी तांदूळ, डाळ तेल , असे साहित्य रिपाईच्या स्थानिककार्यकर्त्यांच्या मदतीने घरोघरी देण्यात आले.वाटप करताना सोशल डिस्टसिंगचे पालन करण्यात आले आहे.रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनीमार्गदर्शन केल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन करित आहे. इंदिरानगर झोपडपट्टी राजू नगर त्रिमुर्ती नगर, अण्णा नगर नगर येथील नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.