ठाणे

लॉकडाऊनमुळे अंबरनाथ आयटीआय येथे ई-लर्निंगद्वारे घेतला जातोय प्रशिक्षणार्थ्यांचा अभ्यास

अंबरनाथ दि. ०९ (नवाज अब्दुलसत्तार वणू) :  कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने प्रत्यक्ष आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेता येत नसले, तरी आयटीआय अंबरनाथ येथे प्रशिक्षणार्थ्यांचा ई-लर्निंगच्या माध्यमातून अभ्यासक्रम घेणे सुरू ठेवण्यात आलेले आहे व अशाप्रकारे प्रशिक्षणार्थींचे “स्टडी फ्रॉम होम” सुरू असल्याचे अंबरनाथ आयटीआयचे प्राचार्य,ए.पी. शिंदे यांनी सांगितले.
          व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय मुबईचे सहसंचालक डॉ.अनिल जाधव यांनी दिनांक ३० मार्च २०२० रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व प्राचार्यांची बैठक घेऊन प्रत्येक आयटीआय मध्ये ई-लर्निंगच्या माध्यमातून प्रशिक्षण सुरू ठेवण्याबाबत आदेशित करून मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने अंबरनाथ आयटीआय येथे निदेशकांनी त्यांच्याकडील बॅच निहाय “व्हाट्सअप ग्रुप” तयार करून त्यावर प्रशिक्षणाशी संबंधित “व्हिडिओज, नोट्स, प्रश्न संच” असे अभ्यास साहित्य पाठवून व संपर्कात राहून प्रशिक्षणार्थी यांचा अभ्यास घेण्याबाबत कार्यवाही सुरू ठेवलेली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने विहित केलेल्या ऑनलाईन फॉर्ममध्ये प्रत्येक निदेशक त्यांनी दर दिवशी दिलेल्या प्रशिक्षणाचा अहवाल सादर करीत आहे. यात इलेकट्रीशनचे नवीन भोपी सर, कॉम्पुटरच्या देशमुख मॅडम, पेंटरचे के. डी. पाटील, वायरमनचे दातार सर, बोडके सर, केमिकल ग्रुपचे मंचरकर सर, बैट सर, पीपीओचे चव्हाण सर, रब्बरचे म्हात्रे सर, टीडीएमचे शेख सर, ऑटोमोबाईलचे डी. एम. पाटील सर, देवकटे सर, पीएमचे गायकवाड सर, चौधरी सर, मेकॅनिकलचे राणे सर, राठोड सर, कुरकुरे सर, शिरीष पाटील सर, परपटे सर, ब्युटीपार्लरचे यादव मॅडम, ड्रॉईंगचे गोडांबे सर, भालेराव सर तसेच “मॅथ्स”च्या पाटील मॅडम आदी निदेशक असून त्यांना प्राचार्य ए.पी. शिंदे हे नियमितपणे आढावा घेऊन मार्गदर्शन करीत असतात. तसेच संस्थेचे उपप्राचार्य जाधव, गटनिदेशक बारगळ, काकडे, खांडेकर व पी व्ही पाटील आदी निदेशकांना प्रोत्साहन देत असतात.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!