डोंबिवली (शंकर जाधव ) : कोरनामुळे संचारबंदी लागु केली असतानाच हातावर पोट भरणाºया कामगारांचे मोठे हाल होत आहेत. त्यांचे हाल थांबावे यासाठी महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त अमित दुखंडे यांच्या पुढाकाराने सहा संस्थांद्वारे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. यावेळी दिवसरात्र कर्तव्य बजावणारे पोलीस, आरोग्य तसेच सफाई कामगारांसोबतच रस्त्याच्या आजुबाजुला असणाºया वस्त्या आणि रस्त्यावर झोपणाºया निराधरांना आधार देण्यासाठी पंधरा दिवसांचे रेशन देण्यात आले आहे. आधार इंडीया, जाणता प्रतिष्ठान , शिक्षण स्वाभिमानी संघटना, युवा असोशिएशन, दुखंडे प्रतिष्ठान यांच्यामार्फत चहा, नाश्ता, जेवण, पाणी देखील देण्यात आले. इतकेच नव्हे तर रिक्षा बंद असल्याने रिक्षाचालकांच्या कुंटुंबियांना देखील मदतीचा गरज असल्याचे लक्षात येताच त्यांना देखील मदत करण्यात आली आहे. यावेळी पोलीस मित्र जितेंद्र आमोणकर, सगार दुखंडे, जाणता प्रतिष्ठानचे नितीन चौधरी व इतर संस्थांच्या पदाधिकाºयांनी परिश्रम घेतले.
समाजरत्न अमित दुखंडे यांनी केली निराधारांना मदत
April 13, 2020
20 Views
1 Min Read

-
Share This!