महाराष्ट्र

वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार व्यक्तींचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज

सबंधित जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या देणार 

मुंबई, दि १४ : कोरोना युद्धात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आरोग्य क्षेत्राशी सबंधित २१ हजार जणांनी तशी इच्छा व्यक्त केली असून त्यांचे अर्ज आता छाननी करून त्या त्या जिल्ह्यांकडे प्रत्यक्ष सोपविण्याचे काम सुरु आहे.

कोरोनाच्या या लढ्यात शासनाला प्रत्यक्ष सहभागी होऊन मदत करावी असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. डॉक्टर्स, आरोग्य सेवेत काम केलेले निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉडबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेले परंतू ज्यांना जागा नाही म्हणून काम मिळाले नाही पण त्यांना काम करण्याची इच्छा आहे त्या सर्वांनी पुढे येऊन आपले  नाव, पत्ता [email protected] या ई मेलवर नोंदवावे असे सांगितले होते.

अवघ्या ५ दिवसांत २१ हजार जणांनी विविध अर्ज करून तशी इच्छा व्यक्त केली. यामध्ये ९४३ डॉक्टर्स, ३३१२ परिचारिका, ११४१ फार्मसिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ ८६३, वार्ड बॉय ७६६, पॅरा वैद्यकीय ६१४, इतर वैद्यकीय ५६९, सैन्यातील निवृत्त ७६ तसेच इतर व्यक्तींमध्ये समाज सेवक, वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत. या सर्वांसाठी एक गुगल फॉर्म देण्यात आला. त्यातून सुमारे १८ हजार व्यक्तींनी हे फॉर्म भरून दिले.

आता या व्यक्तींना आवश्यकतेनुसार विविध जिल्ह्यांत पाठविण्यात येईल. सबंधित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी हे या वैद्यकीय स्वयंसेवकांना जबाबदारी देतील असे काल झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ठरले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!