ठाणे

अतिरीक्त रस्ते बंद करण्याचे पोलिसांचे आदेश ; ममता आणि एम्स हॉस्पीटलला जाणारे सर्व रस्ते बंद 

डोंबिवली  ( शंकर जाधव )  : कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने कल्याण – डोंबिवली महापालिकेने सतर्कता दाखवून अनेक ठिकाण बंद केली आहेत. मात्र काही नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता रस्ते बंद केल्याचे चित्र कल्याण – डोंबिवली महापालिका क्षेत्रात दिसून येत आहे. विशेष म्हणजे या नागिरकांनी डोंबिवली पूर्व येथील एमआयडीसी परिसरात असणाºया ममता हॉस्पीटल येथे जाण्या- येण्याचा रस्ताच अडवून टाकल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान अतिरीक्त रस्ते बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिले असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. त्यामुळे रस्ते नेमके कोणी बंद केले याबाबत हॉस्पीटल व्यवस्थापक देखील संभ्रमात आहे.
कल्याण डोंबिवली परिसरात मंगळावारी एकही कोरोनाग्रस्त रूग्ण सापडला नसल्याने सगळेच नागरिक चिंतामुक्त होते. मात्र असे असतानाच बुधवारी डोंबिवली पूर्व परिसरात एक पुरूष आणि एक महिला असे दोन जणांना कोरोना झाल्याचे उघड झाले. त्यामुळे शहरात पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. असे असतनाच नागरिकांनी त्यांच्या तुसड्या वागणुकीचा उच्चांक गाठला असून धर्माधिकारी चौक ते आर .आर हॉस्पीटलाचा मुख्य रस्ता अडवला आहे. इतकेच नव्हे ममता हॉस्पीटला जाणारे आतील रस्ते देखील बांबू घालून अडवून ठेवले आहेत. त्यामुळे एखाद्याा रूग्णाला जर ममता हॉस्पीटलला जायचे असेल तर त्यांनी कसे जावे असा प्रश्न येतील काही रहिवाशांना पडला आहे.पोलिसांना विचारले असता अम्ही काही ठरविक रस्ते सुरू ठेऊन बाकी रस्ते बंद करण्याचे आदेश कार्यकत्यांना दिले असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौरे यांनी दिली.  मात्र ममता हॉस्पीटल आणि एम्स हॉस्पीटलला जाण्यासाठी एकही रस्ता सुरू नसल्याचे निदर्शनास आले तर रूग्णांसाठी एक रस्ता खुला करून देण्यात येईल असे सांगितले. दरम्यान डोंबिवली पूर्व येथील गावदेवी ते आयकॉन हॉस्पीटलचा भागात रूग्ण मिळाल्याने हा भाग देखील बंद करण्यात आला असून संपूर्ण डोंबिवली पूर्व येखील जवळपास सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!