डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात काल एकही नवा रुग्ण आढळून आला नाही उलट एकजण बरा होऊन घरी गेला याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला होता. मात्र डोंबिवली पूर्व मध्ये सोमवारी २ नवे रुग्ण आढळून आले असून ते खाजगी रुग्णालयातील आहेत. यामुळे एकूण संख्या आता ३९ झाली आहे. डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांची विगतवारी खालील प्रमाणे.
आजची रुग्ण संख्याः- एकुण – 02,
पुरुष 30 वर्षे (डोंबिवली पूर्व)
महिला 42 वर्षे (डोंबिवली पूर्व)
दोन्ही खासगी रुग्णालयातिल रुग्ण
आजपर्यंतचे एकुण रुग्णः- 58 पैकी -2 मयत, 13+4=17डिसचार्ज (1 निळजे आरोग्य केद्रातील धरुन)
एकुण उपचार घेत असलेले रुग्ण – 39
महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण :- 57 रुग्णांपैकी – 2 मयत, 12+4 = 16 डिसचार्ज
एकुण उपचार घेत असलेले रुग्ण 39 आहेत त्यामुळे डोंबिवलीकरानी विनाकारण घराबाहेर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले
—————————— ———
डोंबिवलीकर खरेदीसाठी रस्त्यावर
–—————————– ———
महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी 12 ते 14 एप्रिल औषधे ,दूध वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश दिले होते आज त्याची मुदत संपताच भाजी व धान्य खरेदीसाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती.एका बाजूने प्रशासन कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नाची प्रयत्न करत असताना नागरिक मात्र बिनधास्तपणे गर्दी करून ,नियम मोडून खरेदीसाठी गर्दी करत आहेत.