डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना मुळे सारे जनजीवन ठप्प झाले आहे.त्यामुळे डोंबिवलीतील सर्व सामान्यांचे – गरिबांचे जीणे मुश्किल झाले आहे.या डोंबिवलीकरांंना मिळणाऱ्या मदतीबाबत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला आस्थेवाईकपणे विचारपूस केली आहे.
.टाळेबंदी झाल्यामुळे डोंबिवलीतील विविध वस्त्यांमध्यील नागरिकांना अन्न धान्य उपलब्ध व्हावे याकरिता रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे डोंबिवली शहर शाखेच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले.
रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या हस्ते विविध ठिकाणी तेल धान्य वाटप करण्यात आले.तसेच आरोग्याच्या सुरक्षेसाठी सँनीटायझर, मास्क देखील देण्यात आले आहेत.
इंदिरानगर झोपडपट्टी राजू नगर त्रिमुर्ती नगर, अण्णा नगर येथील नागरिकांना मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले. रिपब्लिकन नेते बुध्दवासी जगनदादा गायकवाड यांच्या सामाजिक चळवळीतील योगदानामुळे मंत्री रामदास आठवले यांचे भावनिक नाते डोंबिवली शहरासोबत जुळले आहे.डोंबिवलीतील रिपाईच्या कार्यकर्ते सोबत त्यांचे
अनेक वर्षाचा नातेसंबध असल्याने करोनासारख्या संकट समयी रामदास आठवले यांनी आस्थेवाईकपणे विचारपूस केली असल्याचे अंकुश गायकवाड यांनी सांगितले.