डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे शहरातील पौरोहित्य करणाऱ्या ब्राम्हण समाजातील पुरोहिताची गेले अनेक दिवस कोणतेही काम मिळालेलं नाही यामुळे मोठी अडचण होत आहे हा काळ लग्न समारंभाचा असूनही २ महिने काम मिळेल अशी परिस्थिती नाही. अशा वेळी त्यांना त्यांचा चरितार्थ चालवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.हे लक्षात घेऊन ब्राम्हण महासंघाने मदत निधी जमा करण्याचे ठरवले आहे नागरिकांनी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे
डोंबिवलीत पौराहित्य करणारे सुमारे 500 च्या दरम्यान पुरोहित असून त्यातील 50 ते 60 जण केवळ याच व्यवसायात असल्याने त्यांच्या कुटुंबियांची मोठी उपासमार होत आहे गरजु पुरोहितांची पहिली यादी बनविण्यात आली आहे ,व लवकरच सर्व गरजुंना ब्राह्मण महासंघ डोंबिवलीच्या वतिने मदत करण्यात येणार आहे.प्रत्येक गरजू पुरोहितास अन्नधान्य व गरजेच्या वस्तू दिल्या जाणार आहेत
नागरिकांनी पुढे येवुन आपल्या परीने जास्तीत जास्त या कार्यात आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे
अधिक माहिती करिता संपर्क -मानस पिंगळे -9819863206