ठाणे

दुकाने बंद तरी नशा केलेले नागरिक पदपथावर – तर निराधारांसाठी पालिकेचा आधार

डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने ३ मे पर्यंत संचारबंदी वाढवली आहे. त्याच पाश्र्वभूमीवर हातावर पोट असणाºया आणि रस्त्यावर झोपणाºया नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी कल्याण – डोंबिवली महापालिकेने निवारा केंद्र आणि बीएसयुपीच्या घरांची सोय केली आहे. जवळपास १८० जण या घरांमध्ये राहत असून  त्यांच्या अन्न पाण्याची जबाबदारी महापालिकेने घेतली आहे. मात्र असे असले तरी अद्याापही अनेक निराधार नागरिक पदपतथावर झोपलेले पहावयास मिळत आहेत. तर काही जण सर्व बंद असताना नशा करून पडलेले दिसतात. त्यामुळे या नागरिकांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.
कोरोनाने हाहा:कार माजवला असताना कल्याण – डोंबिवली पालिकेने अनेक उपाययोजना केल्या आहेत.  सध्यस्थितीत भाजीपाला बाजार पूर्णत: बंद असून किराणामाल दुकाने मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी  देण्यात आली आहे. तसेच इतर राज्यातून आलेल्या आणि हातावर पोट असणाºया नागरिकांसाठी शेलार नाक्यावरील बीएसयुपीच्या घरांची सोय केली अशून या घरामध्ये जवळपास ८० ते ८५ जणे राहत आहेत. तर डोंबिवली पूर्व येथील पांडुरंगवाडी परिसरातील निवारा केंद्रात जवळपास ८० जणांची सोय केली आहे. त्यामुळे जवळपसा १६० ते १७० नागरिकांची पालिका उत्तम प्रकारे काळजी घेत असल्याची माहिती पालिका प्रशासानाने दैनिक पुढारीशी बोलताना दिली. विशेष म्हणजे बीएसयुपी येथे राहणाºया दोन ते तीन नागरिकांची तब्येत बिघडली असल्याचे कळताच तोबडतोब डॉक्टरांचा एक चमु तेथे पाठविला असल्याचेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले.  असे असले तरी अद्याापही काही फुटपाथावर माणसे झोपलेली दिसून येत असल्याची तक्रार नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. मात्र हे निराधार नागरिक आज पांडुरंग वाडी तर उद्याा गुप्ते रोडवरील फुटपाथवर झोपताना दिसत असल्याने नेमका  कोणता परिसरा शोधायचा असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे. तर काही जणांना बंदीस्त राहयाची सवय नसल्याने पालिका प्रशासनाची गाडी आली की ते लपत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे या नागरिकांना कोरोनाचा धोका असल्याने या नागरिकांमुळे आधीच भयभीत झालेले डोंबिवली शहराला सावरणे कठीण होईल. त्यामुळे भाजपाला किंवा किराणामाल घेण्यासाठी जेव्हा बाहेर पडता त्यावेळी असे नागरिक रस्त्यात दिसले तर त्या प्रभाग अधिकाºयांच्या निदर्शनास आणून द्याावे असे सांगण्यात आले आहे

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!