सुमित सुभाष भोईर यांचा पुढाकार ; जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
दिवा- शीळ :- युवासेनाप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री मा. श्री. आदित्य ठाकरे साहेब यांचे निकटवर्तीय, युवासेना अधिकारी श्री. सुमित सुभाष भोईर यांनी वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत तीन हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करुन नवा आदर्श निर्माण केला आहे.सध्या देशभरात लाॅकडाऊन असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या अनेक कुटुंबांना बेरोजगारी मुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. जनतेची होणारी दैना पाहून माजी आमदार सुभाष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमित सुभाष भोईर यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कल्याण ग्रामीण मतदार संघातील विविध भागांतील तीन हजार कुटुंबियांना किराणा मालाचे वाटप करुन सामाजिक बांधिलकीचे जपली आहे.
यामध्ये तांदूळ, डाळ, साखर, तेल, कांदे, बटाटे, मसाला, हळद, मीठ आदी जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. त्याचा लाभ गरजू कुटुंबांना झाला आहे. सुभाष भोईर फाऊंडेशन मार्फत कल्याण ग्रामीण मतदार संघातील कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवाना, वाहतूक शाखा, अग्निशमन आधिकारी व कर्मचारी तसेच गरजू व्यक्तींना मास्क, सॅनिटायझर, तसेच २५ मार्च पासून दररोज एक हजार जेवणाचे व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात येत आहे.