ठाणे

ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी  धरणात ५१ टक्के साठा …पाणी कपात गरज नाही 

डोंबिवली  ( शंकर जाधव  ) : कोरोना संकटामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल असा दिलासा दिला आहे त्यातच आता ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात यंदा ५१ .९४ टक्के पाणी साठा आहे हा साठा ३१ जुलै पर्यंत टिकेल.यामुळे दरवर्षा प्रमाणे पाणी कपातीचे संकटातून सुटका होणार आहे.यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही आनंद वार्ता होणार आहे.
कल्याण डोंबिवलीतच नव्हे तर ठाणे जिल्ह्यात दरवर्षी साधारण जानेवारी अखेर पासून आठवड्यास्तूंन एक दिवस २४ तास पाणी पुरवठा बंद केला जातो. यंदा मात्र अजून तसा निर्णय झाला नाही. मात्र मध्यतरी पाणी कपात होणार अशाही बातम्या होत्या
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणार्या बारवी धरणाची उंची ४  मीटरने वाढवल्याने धरणाची उंची ७२.६०मी एवढी झाली आहे. महाराष्ट्र ओद्योगिक विकास महामंडळ ने बदलापूर येथे बारवी धरण बांधले असून यंदा उंची वाढल्याने धरणातील पाणी साठा ३४० .७८ द ल ली मीटर इतका झाला होता धरणात मागील वर्षांपेक्षा १०६  द ल ल घ मी इतका जादा पाणीसाठा असल्याने पाणी कपातीची गरज नाही असे अधिकारी सांगत आहेत यामुळे यंदा पाणी कपात नाहीच शिवाय पाऊस पण समाधानकारक असल्याने नागरिकांना हा मोठा दिलासा ठरणार आहे बारवी धरणात ५१.४० टक्के इतका पाणीसाठा असून जुलै अखेर हा साठा पुरेल असे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे (बारवी धरण ) यांनी सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!