महाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरु

एका दिवसात 124  गुन्ह्यांची नोंद तर 55 आरोपींना अटक

22 लाख 22 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई दि. 17 : अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरु आहे. काल दिनांक 16 एप्रिल 2020 रोजी राज्यात 124 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 22 लाख 22 हजार रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

24  मार्च 2020 ते 16 एप्रिल 2020 पर्यंत राज्यात 2 हजार 933 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1 हजार 198 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 169 वाहने जप्त करण्यात आली असून 7 कोटी 39 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू

अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे. या  नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३ तर व्हाट्सॲप क्रमांक ८४२२००११३३  आहे. या क्रंमाकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असल्याने नमूद क्रमांकावर अवैध मद्य बाबतची तक्रार नोंदविण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!