डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली सोशल फाऊंडेशनतर्फे जवळपास १२० पीपीई कीट देण्यात आले आहेत. यातील १०० कीट आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या हातात सुपूर्द करण्यात आले तर २० कीट शास्त्री नगर रूग्णालयात देण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक मोहीत भोईर यांनी दिली. विशेष म्हणजे डोंबिवली शहरात अधिकाधिक कोरोना विषाणुची तपासणी व्हावी यासाठी प्यत्नशील असल्याचे भोईर यांनी सांगितले. यावेळी अरूण जोशींसह सहा ते सात जण मदतीचा हात देत असल्याची माहिती भोईर यांनी दिली.
डोंबिवली सोशल फाऊंडेशनतर्फे पीपीई कीटचे वाटप
April 18, 2020
29 Views
1 Min Read

-
Share This!