आरोग्यदूत महाराष्ट्र मुंबई

फोर्टिस रुग्णालयामधून दोन कोरोनाबाधितांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले

  मुंबई   ता. 19 एप्रिल, संतोष पडवळ :    मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयामधून दोन कोरोनाबाधितांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आले. ताप, थंडी, कोरडा खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने दोन्ही रुग्ण रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. या दोघांनाही प्रवासाचा कोणताही इतिहास नव्हता. मात्र, योग्य ती काळजी घेत यशस्वी उपचारानंतर त्यांना शनिवारी घरी सोडण्यात आले. ताप, थंडी, कोरडा खोकला आणि श्वासोच्छवासाचा त्रास होत असल्याने २४ मार्चला एक ३९ वर्षीय पुरुष रुग्णालयामध्ये दाखल झाला. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यामुळे होणाऱ्या श्वसनाच्या त्रासामुळे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर  त्याला स्थिर करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याच्या फुफ्फुसात सुधारणा झाल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरमधून बाहेर काढण्यात आले.
त्याचप्रमाणे १ एप्रिलला  ताप, सर्दी आणि खोकल्याच्या तक्रारी मुळे ४८ वर्षीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर आयसोलेशन वार्डमध्ये लक्षणात्मक उपचार करण्यात आले.  उपचारांना पुरेसा प्रतिसाद दिल्यानंतर त्यांच्या करण्यात आलेल्या कोरोनाच्या दोन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर या दोन्ही रुग्णांना घरी सोडण्यात आले. यावेळी वैद्यकीय पथकांनी दोन्ही रुग्णांना घरगुती संगोपनाची काळजी घेण्याबाबत समुपदेशन केले. आरोग्यसेवा पुरविणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम) च्या सहकार्याने अधिकारी आणि आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने आम्ही प्रत्येक रूग्णाच्या संपर्कात आहोत, असे फोर्टिस रुग्णालय मुलुंडच्या झोनल डायरेक्टर एस. नारायणी यांनी सांगितले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!