महाराष्ट्र

खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध; संबंधितावर गुन्हा दाखल होणार

मुंबई, दि. 20 : ग्रामविकास विभागातील विविध पदांच्या भरतीची खोटी जाहिरात प्रसिद्ध करणाऱ्यावर गुन्हा दाखल होणार. विविध पदांच्या पदभरतीसाठी https://www.egrampanchayat.com या संकेतस्थळावर खोटी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे कोणतीही पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन नाही. राज्यस्तरीय सरळसेवा निवड समिती अशा प्रकारची कोणतीही समिती ग्रामविकास विभागाच्या अधिनस्त कार्यरत नाही. प्रकल्प व्यवस्थापक, ई-ग्रामपंचायत असे कोणतेही पद अस्तित्वात नाही. ही जाहिरात पूर्णत: खोटी.

या जाहिरातीच्या माध्यमातून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची दिशाभूल करुन मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा करण्याचा प्रयत्न. खोटी जाहिरात देणाऱ्याविरुद्ध पोलिसात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू. या खोट्या जाहिरातीस कोणीही बळी पडू नये असे आवाहन ग्रामविकास विभागाचे केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!