ठाणे

मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांच्या आवाहनाला अंबरनाथकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अंबरनाथ दि. २० (नवाज अब्दुलसत्तार वणू)   सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चाललेला आहे. परंतु, या संकटावर मात करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळ शर्तींचे प्रयत्न करीत असून अतिशय उत्तमरीत्या सर्व उपाययोजना यशस्वीरीत्या पूर्णत्वाला नेत आहेत. तरी सुद्धा राज्यात अनेक भागांमध्ये सर्वसामान्य नागरिकांपासून ते रोज हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांपर्यंत सर्वांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकारबरोबर आपण सर्वांनी देखील एकत्र येऊन या परिस्थितीचा सामना केला पाहिजे आणि आपल्या बंधू-भगिनींना सहाय्य केले पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजनेमध्ये सहकार्य करून ही योजना सफल करण्यात खारीचा वाटा उचलू, असे आवाहन शिवसेना शहरप्रमुख अरविंद शिवलिंग वाळेकर व अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर यांनी केल्यानंतर सोमवारी (२० एप्रिल रोजी) अंबरनाथचे तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे स्वतः नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, नगरसेवक निखिल वाळेकर यांच्यासह अंबरनाथ शहरातील सुमारे १२६ सर्वसामान्य नागरिकांनी, व्यापारी व प्रतिष्ठित नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधीत” धनादेश जमा करून सुमारे १४ लाख ४७ हजार ५४७ रुपयांचा निधी जमा करत खारीचा वाटा उचलला आहे.
              अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनिषा अरविंद वाळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यावर कोरोनाचा जे संकट आलेले आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे मंत्रिमंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असून नागरिकांना दिलासा देत आहेत. तसेच पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे देखील उत्तम काम करीत आहेत व त्यांच्या सततच्या मार्गदर्शनाखाली मी नगराध्यक्षा या नात्याने व शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”ला मदत करण्याकरिता अंबरनाथकरांना आवाहन केले होते, या आवाहनाला अंबरनाथकरांनी प्रतिसाद देत “मुख्यमंत्री सहाय्यता निधी”त धनादेश देत मदत केलेली आहे. सुमारे ११ लाखांपर्यंत निधी जमा होईल असा अंदाज आमचा होता, परंतु, त्यापेक्षाही जास्त निधी जमा झालेला आहे. असेही नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी सांगितले. तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व अंबरनाथकरांचे आभार देखील मानले.
Attachments area

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!