महाराष्ट्र मुंबई

राज्यात आतापर्यंत लॉकडाऊन कालावधीत ५७ हजार गुन्हे दाखल ;१२ हजार व्यक्तींना अटक तर ४० हजार वाहने जप्त

मुंबई, दि.20 : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.22 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 57,517 गुन्हे दाखल झाले आहेत तर 12,123 व्यक्तींना अटक करण्यात आली असून 40,414 वाहने जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.

उपरोक्त कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 73,344 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा 572 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1051 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्याभरात नोंदवले आहेत.

तसेच विविध गुन्ह्यांसाठी 2 कोटी 20 लाख (2 कोटी 20 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

11 अधिकारी व 38 कर्मचाऱ्यांना पोलिसांना बाधा

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24 तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 11 पोलीस अधिकारी व 38 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 117 घटनांची नोंद झाली असून यात 411 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!