अंबरनाथ दि. २० (नवाज अब्दुलसत्तार वणू) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र देशभरात सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित केले असून यात हातावर पोट असणाऱ्या व दैनंदिन प्रवाशांची आपल्या रिक्षातून वाहतूक करून आपले व आपल्या कुटूंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या अंबरनाथ शहरातील कानसई विभागातील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली होती. ही बाब येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंबरनाथ शहराध्यक्ष कुणाल सुभाष भोईर व नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांनी गांभीर्याने लक्षात घेऊन रिक्षा चालकांना पुढील १५ दिवस पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूच्या स्वरूपात धान्याची मदत केली. याप्रसंगी मनसेचे सूर्यकांत भोईर, रवींद्र भोईर, दिलीप सहस्रबुद्धे, जपेश भोईर, सुमित ठाकरे, स्वच्छंद पिंपळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कानसई विभागातील रिक्षा चालकांना लॉकडाऊनमध्ये कुणाल भोईर यांनी जीवनावश्यक वस्तू देत केली मदत
April 21, 2020
19 Views
1 Min Read

-
Share This!