ठाणे

ठाणे शहरात सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करणा-या मुंब्रातील ५ तर नौपाडातील ४ दुकानांवर कारवाई.

ठाणे (ता 23,  संतोष पडवळ ):  महापालिकेच्यावतीने वारंवार सूचना देवूनही सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणा-या मुंब्रातील ५  व नौपाडा प्रभाग समितीमधील एकूण ४ दुकानांवर महापालिकेच्यावतीने भादंवि कलम अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये कारवाई करून दुकाने सील करण्यात आली आहेत. याबाबत सोशल डिस्टन्सींगचे उल्लंघन करणा-या दुकानदारांवर कडक कारवाई करण्याचे तसेच संबंधित दुकान सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
      कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात संसर्गजन्य रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागु असताना मुंब्रा, नौपाडा प्रभागसमितीमधील दुकानदाराकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करण्यात आले आहे. प्रशासनाने धान्य भांडार पुरविणारे घाऊक व्यापारी यांना ऑनलाईन व फोनवरुन मालाची मागणी स्विकारुन ती पुरवावी जेणेकरुन बाजारात ग्राहकांची गर्दी न होता सोशल डिस्टन्स नियमांचे पालन होईल तसेच दुकान सुरू करण्यासाठी ठराविक वेळ दिली आहे.
          परंतु मुंब्रा प्रभाग समितीमधील ऋषीकेश जनरल स्टोअर्स ( घन:शाम मोरे) अचानक नगर, भटांनी डेअरी (कैसर अली), मुंब्रा मार्केट, अय्याज बॅयलर(रियाज) आनंद कोळीवाड, किंग्ज बाॅयलर(कास्म शेख), आनंद कोळीवाडा, यादव डेअरी ( राममुरत यादव), मुंब्रा मार्केट या पाच तर नौपाडा प्रभाग समितीतंर्गत करिना स्टोअर्स(रतन पुरी), गजानन स्टोअर्स(अनिल सिंग), अ.एम. ट्रेडर्स( गुलमहम्मद मेमन), प्रविण स्टोअर्स( प्रतिक करीया) आणि गणेश ग्रीन स्टोअर्स(प्रदिप करसन गाला) या चार दुकानादारांवर भारतीय साथरोग अधिनियम , १८९७ व भारतीय दंड संहितेचे कलम , १८८ व अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!