डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोना विष्णूचा संसर्ग व यामधून मार्ग काढण्यासाठी डोंबिवली येथील डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सिस्टर निवेदिता शाळेने आपले पाऊल पुढे टाकले आहे .या साठी मंडळाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक , वरिष्ठ शिक्षक यांच्याशी विचारविनिमय करून शासनाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना कसे संरक्षण देता येईल याबाबत चर्चा झाली व असे ठरविण्यात आले आहे कि, शाळेसाठी मंडळाकडून देण्यात येणाऱ्या बस सेवेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, जीएसटी ट्रॅकर, विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसण्याची सोय इ. साधने असणे अनिर्वाय आहे. तसेच विद्यार्थ्यांना बसमधून ने आण करण्यापूर्वी सर्व बस देखील नित्य नेमाने disinfect करून घेतल्या जाणार आहेत. शाळेच्या कर्मचारी वर्गाची योग्य ती आरोग्य तपासणी करून व त्यांना आवश्यक ती सुरक्षित साधने देऊन बसेस शाळेच्या बाहेर सोडल्या जाणार. बसेस चे शुल्क ही किलोमीटर मिटर वर आकारण्यात आलेले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२० २१ साठी शाळा सुरू झाल्यावर भविष्यात मुलांच्या आरोग्याची कशी काळजी घेता येईल या अनुषंगाने वेळोवेळी संपूर्ण शाळेच्या परिसराचे निर्जंतुकिकरण करण्यात येणार आहे. तसेच शाळेचे निम्मे विद्यार्थी शाळेच्या बसने व काही विद्यार्थी खाजगी वाहनाने ये जा करतात. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने विचार करून खाजगी वाहनाने मुलांना शाळेत नेणे व आणणे टाळावे व शाळेच्या बस चाच वापर करावा असे आवाहन देखील शाळेतर्फे पालकांना करण्यात येत आहे जेणे करून इतर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर देखील दुष्परिणाम होणार नाही.
सिस्टर निवेदिता शाळेत केजी ते ते इयत्ता दहावी पर्यंत फोर डिव्हीजनची व्यवस्था करण्यात आल्यामुळे चे सन २०२०/२१ची प्रवेश प्रक्रिया सप्टेंबर २०१९ पासूनच सुरू केली आहे. आतापर्यंत जवळपास ३०० प्रवेश निश्चित झाले असताना या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रियेला स्थगिती आली होती . अनेक पालकांसमोर आपल्या पाल्याला प्रवेश कसा मिळेल? असा प्रश्न उद्भवलेला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शाळेने आपली ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पालकांसाठी खुली करून दिलेली आहे .एवढेच नव्हे तर दूरध्वनी क्रमांक देखील उपलब्ध करून दिलेले आहेत . ज्याद्वारे पालक दूरध्वनी द्वारे संभाषण करून आपल्या समस्यांचे निराकरण करू शकतात अनेक पालक या सुविधांचा लाभ घेत आहे. दररोज शाळेचे कर्मचारी पालकांना दूरध्वनी द्वारे योग्य ते मार्गदर्शन करत आहेत. पंचेचाळीस वर्ष जुना वारसा लाभलेली सिस्टर निवेदिता शाळा नेहमीच विद्यार्थी व पालक यांच्या हितासाठी वेगवेगळे उपक्रम करून आपले नावीन्य जपत आली आहे. तरी पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे सांगितले.अधिक माहितीसाठी शाळेची वेबसाईट : www.snes.org.in ,
कॉन्टॅक्ट नंबर :9987978454 चेतना आणि8454880250 नेहा नारकर