डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पूर्वेकडील म्हात्रे नगर प्रभागाचे नगरसेवक मुकुंद (विशु) पेडणेकर यांनी लॉक डाऊन काळात प्रभागातील ५३० हुन अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तसेच गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. प्रभागातील गुरुवायूर मंदिर ट्रस्ट , प्रभागातील सेवाभावी नागरिकांच्या आर्थिक सहकार्याने व भा. ज.पा.वॉर्ड क्र.६७ म्हात्रे नगर मधील सर्व कार्यकर्त्यांच्या सक्रिय सहभागामुळे हि मदत गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचविण्यात आली.तसेच कांद्याची वाढती किंमत विचारात घेऊन प्रभागातील साईनाथवाडी सेवा वस्ती मध्ये ३५० किलो कांदे वाटप करण्यात आले. प्रभागातील सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या तरुणांच्या सहकार्याने `रोटी बँक` ही संकल्पना राबवून दररोज प्रभागातील नागरिकांच्या सहकार्याने १५०० ताज्या चपात्या जमा करून त्या भुकेल्या ,गरीब लोकांना वाटल्या जातात.सादर उपक्रम हा प्रभागातील जसमीन शाह आणि मित्र मंडळींच्या सहकार्याने आत्तापर्यंत यशस्वीरित्या राबवित आहे.
डोंबिवलीत `रोटी बँक`संकल्पनेतून मिळले अन्न ….
April 27, 2020
24 Views
1 Min Read

-
Share This!